मराठी निरोप समारंभ भाषण | Marathi Speech Nirop Samarambh Bhashan

नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपण मराठी निरोप समारंभ भाषण | Marathi Speech Nirop Samarambh Bhashan पाहणार आहोत. मित्रांनो शाळेत असताना निरोप समारंभ आयोजित केला जातो, अशा वेळेस निरोप चांगला व्हावा यासाठी आपण दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो अशावेळी आपण काय बोलावं हेच सुचत नाही. यासाठी आम्ही आज खास आपल्यासाठी निरोप घेण्यासाठी भाषण घेऊन आलो आहोत.

Marathi Speech Nirop Samarambh Bhashan

मराठी निरोप समारंभ भाषण | Marathi Speech Nirop Samarambh Bhashan

नमस्कार, आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक आणि माझे प्रिय मित्र मैत्रिणींनो,

आज या मंचावर उभे राहून माझ्या मनात अनेक भावना उसळत आहेत. आज आपण येथे सगळेजण निरोप घेण्यासाठी एकत्र आलो आहोत ही केवळ औपचारिकता नाही तर आपल्या जीवनातील त्या अनमोल शिक्षकांचा समारोप आहे. ज्यांनी आपल्याला केवळ ज्ञानच दिलेलं नाही तर आपल्याला माणूस होण्याचा खरा अर्थ देखील शिकवला. 

जेव्हा आपण हा प्रवास सुरू केला होता तेव्हा आपल्यासाठी प्रत्येक चेहरा हा नवीन होता पण हळूहळू नवीन चेहरे आपले होत गेले, नवनवीन मित्र बनत गेले, आणि या कॉलेजमध्ये सर्वांनी एकत्र येऊन अनेक आठवणी निर्माण केल्या ज्या कधीही मिटणार नाहीत. 

या कॉलेजमधील शिक्षकांचे योगदान आपल्या जीवनात नेहमी महत्वाचे राहील त्यांनी आपल्याला फक्त शिकवलेच नाही तर प्रत्येक टप्प्यावर प्रेरणा ही दिली, जेव्हा आम्हाला वाटत होतं की आम्ही अयशस्वी होऊ तेव्हा त्यांनी आम्हाला पुढे जाण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिले, आज आपण जे काही आहोत त्यात त्यांचे योगदान सर्वात मोठे आहे, आज मी या व्यासपीठावरून सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानू इच्छितो. 

मित्रांनो हा निरोप फक्त जाण्यासाठी नाहीये इथून पुढे आपली एक नवीन सुरुवात होणार आहे. पण या प्रवासात इथे घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक नातं हे आपल्याला पुढे प्रेरणा नक्कीच देत राहील. 

आज या निरोपाच्या क्षणी मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की आयुष्य तुम्हाला कुठेही घेऊन गेले तरी या आठवणी कायम जपून ठेवा, ही मैत्री आणि ही माणसं जरी आपण वेगळे झालो तरी कायम आठवणीत राहतील. 

तुम्हा सर्वांना तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आपल्या या सुंदर प्रवासाला निरोप देणं सोपं नाही, पण पुढे जावं लागेल. कारण पुढे जाणं हाच जीवनाचा नियम आहे. धन्यवाद

मित्रांनो आम्ही येते कॉलेजमधून निरोप घेताना एक मराठी निरोप समारंभ भाषण [Marathi Speech Nirop Samarambh Bhashan] दिले आहे तुम्हाला याची नक्कीच मदत होईल. मला अजून कोणत्या विषयावर भाषण हवे असल्यास आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद